S M L

वाराणसीत मोदींचं डिपॉझिट जप्त होईल -केजरीवाल

Sachin Salve | Updated On: May 9, 2014 05:02 PM IST

kejriwal modi09 मे : निवडणूक आयोगाने परवानगी देऊनही मोदी गंगा आरती करण्यास आले नाही. भाजपला आपला पराभव दिसत असून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचं तर डिपॉझिट जप्त होईल अशी बोचरी टीका आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली.

तसंच आपण मोठ्या फरकाने निवडून येऊ असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला. केजरीवाल आज (शुक्रवारी) वाराणसीमध्ये आहे. वाराणसीत त्यांच्या रोड शोला सुरूवात झालीय. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बातचीत केली.

भाजप इथं निव्वळ राजकारण करत आहे. 'गंगा माँ ने बुलाया है' असं म्हणणार्‍या मोदींना आयोगाने परवानगी दिली होती मग आरती करण्यासाठी का आले नाही ? 'गंगा माँ'ने बोलावून सुद्धा मोदी आले नाही. मुळात मोदींची इच्छाच नव्हती आरती करण्याची अशी बोचरी टीकाही केजरीवाल यांनी केली. केजरीवाल यांच्या रोड शोला सुरूवात झाली. मोठ्या संख्येनं आपचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले आहे. मोदींच्या शक्तिप्रदर्शनानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी केजरीवाल यांनीही भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2014 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close