S M L

नेरुरकर दाम्पत्याच्या बाळाची किंमत केवळ पाच लाख...?

7 एप्रिलमोहन आणि मोहिनी नेरुरकर या दाम्पत्याच्या तीन महिन्यंपूर्वी सायन हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाचा अद्यापही मुंबई पोलिसांना पत्ता लागला नाही. याच केसची आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. याआधी कोर्टानं नेरुरकरांना नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. सुरुवातीला नुकसान भरपाईला नकार दिला होता. आज मात्र महानगरपालिका त्यासाठी तयार झाली असून पाच लाख रुपये कोर्टात जमा केले आहेत. ही नुकसान भरपाईची रक्कम टप्या - टप्प्याने दिली जाणार आहे. पण ही रक्कम या दाम्पत्याला मिळेल तेव्हा खरं ! गेले तीन महिने मोहन आणि मोहिनी या दाम्पत्त्याचं जगणं मुश्कील झालंय. आपल्या बाळाच्या शोधापोटी ते हॉस्पिटल, पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या खेपा घालताहेत. त्यामुळे बाळाच्या शोधतपासातील अपयशाने मुंबई पोलिसांवरही प्रश्न चिन्ह उमटत आहे. गेले तीन महिने बाळाला शोधून त्यांना यश प्राप्त झालं नाही आहे. शिवाय गेल्या तीन महिन्यात सायन पोलिसांनी फक्त तीन मुलांना क्रॉसचेकिंगसाठी नेरुरकर यांच्या घरी नेलं. पण ती तीनही मुलं नेरुरकरांची नाहीत. या अपयशापुढे सायन पोलिस मात्र मुकले आहेत. आईचं झुरणं बघून तरी पोलिसांनी तपास वाढवला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. एकीकडे मोहन नेरुरकरांना बाळ हरवल्याचं दु:ख, बाळाची काळजी हे सगळं ओझं तर आहेच. पण सततच्या कोर्ट-हॉस्पिटल आणि पोलिस चौकीलाघालाव्या लागणार्‍या खेपांमुळे मोहन नोकरीही करु शकत नाहीये. या अवघड परिस्थितीत आपलं बाळ परत सापडेल या एकाच आशेवर ते जगत आहेत. या केसची पुढची सुनावणी 21 एप्रिल असू्‌न ते या दिवसाची आतुरतेने वाट पहात आहेत. तोपर्यंत सध्या तरी नेरुरकरांना पाच लाख रुपयांची भरपाई करण्यात आली आहे. पण हे पाच लाख रुपये त्यांच्यामनातली आपल्या बाळाविषयीची काळजी, त्याला पुन्हा बघण्यासाठी पाहावी लागणारी वाट या सगळ्याची भरपाई कशी करू शकतील, या प्रश्नावर कोर्टाने विचार केला पाहिजे. अशा वारंवार केसेस झाल्यानंतर आता तरी सायन हॉस्पिटलने सुरक्षा व्यवस्था वाढवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2009 11:47 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2009 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close