S M L

मोदी म्हणजे 'दंगा बाबू' -ममता बॅनर्जी

Sachin Salve | Updated On: May 9, 2014 11:40 PM IST

मोदी म्हणजे 'दंगा बाबू' -ममता बॅनर्जी

769MamatavsModi09 मे : लोकसभेच्या रणसंग्रामात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी विरुद्ध पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच आहे. ममतादीदींनी तर आज नरेंद्र मोदींना 'दंगा बाबू'ची उपमाच दिली आहे.

तसंच मी दिल्लीत असते तर मोदींना तुरुंगात टाकलं असतं असंही ममतादीदी म्हणाल्या. कुठल्याही परिस्थिती निवडणुकीत काहीही झालं तरी आपण मोदी सरकारला पाठिंबा देणार नाही असंही ममतादीदींनी ठणकावून सांगितलं. बंगालमध्ये झालेल्या एका सभेत त्या बोलत होत्या.

  विशेष म्हणजे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी असा सामना रंगलाय. मोदींनी ममतादीदींच्याच बालेकिल्ल्यात शारदा चीट फंड गैरव्यवहारात ममतादीदींचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संतापलेल्या ममतादीदींनी मोदींवर कडाडून टीका केली होती. नरेंद्र मोदी सैतान आहे अशी खोचक टीकाही ममतांनी केली होती. एवढेच नाहीतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मोदींचा कसाई असा उल्लेख केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2014 11:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close