S M L

बूथ कॅप्चरिंग प्रकरणी राहुल गांधींना आयोगाची क्लीन चिट

Sachin Salve | Updated On: May 11, 2014 01:09 PM IST

vk_samapat4510 मे : बूथ कॅप्चरिंग प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना क्लीन चिट दिली आहे.  अमेठीत राहुल गांधींनी मतदान केंद्रात जाऊन वोटिंग मशिनची तपासणी केली होती, पण त्यावेळी वोटिंग मशिनमध्ये बिघाड होता त्यामुळे बूथ कॅप्चरिंगचा प्रश्न निर्माण होत नाही असं स्पष्टीकरण संपत यांनी दिलं.

मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांची आयबीएन-नेटवर्कचे संपादक राजदीप सरदेसाई यांनी खास मुलाखत घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी संपत यांनी आयोगावर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं. निवडणूक आयोग कमकुवत नाही. आयोग आपलं काम चोखपणे पार पाडत आहे. राजकीय पक्षांनी आरोप करतांना याचे भान बाळगले पाहिजे असा सल्लाही संपत यांनी दिला.

बुधवारी आठव्या टप्प्यात मतदानाच्या दिवशी अमेठीमध्ये मतदान सुरू असताना राहुल गांधी मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनच्या जवळ गेले होते. नियमांनुसार जर एखादा उमेदवार मतदार मत देत असताना जवळ गेला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. यावर आक्षेप घेत आम आदमी पार्टीने निवडणूक आयोगाकडे बूथ कॅप्चरिंग आणि फेरफार केल्याची तक्रार दाखल केलेली होती. पण निवडणूक आयोगाने आपचे आरोप फेटाळून लावले होते.

आज मुख्य निवडणूक आयुक्तांनी या प्रकरणी राहुल यांनी क्लीन चिट देऊन प्रकरणावर पडदा टाकलाय. दरम्यान, दुसरीकडे निवडणूक आयोगाने राहुल गांधींनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावलीय. या प्रकरणी 12 मेच्या आधी त्यांना उत्तर देणं आवश्यक आहे. राहुल यांनी सोलनमधल्या सभेत भाजपवर टीका केली होती. या टीकेमध्ये भाजप लोकांमध्ये द्वेष पसरवत असून भाजप सत्तेवर आल्यास 22 हजार लोक मारले जातील असं म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2014 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close