S M L

प्रचार संपला, आता 12 ला मतदान आणि 16 मेला फैसला !

Sachin Salve | Updated On: May 10, 2014 07:54 PM IST

7856voting_mumbai_new10 मे : लोकसभा निवडणुकीसाठी आज अखेर नवव्या टप्प्यातल्या प्रचाराचा शेवट झाला. एकूण नऊ टप्प्यात घेण्यात आलेली मतदान प्रक्रियेत नव्या टप्प्यासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे.

देशातील प्रमुख लढतीपैकी वाराणसीसह उत्तर प्रदेशातल्या 18, पश्चिम बंगाल 17 आणि बिहारच्या 6 जागांसाठीच प्रचार पूर्ण झाला. आता दोन दिवसांनी म्हणजे सोमवारी 12 तारखेला या ठिकाणी 41 जागांसाठी मतदान होणार आहे. आज (शनिवारी) शेवटच्या टप्प्यात वाराणसीच्या आखाड्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जंगी रॅली काढल्यात. या रॅलीला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.

तर नरेंद्र मोदींनी सभा घेऊन प्रचाराचा अखेर केला. वाराणसीत याअगोदर भाजपचे नेते नरेंद्र मोदी, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं होतं. 16 व्या लोकसभेला सामोरं जात नऊ टप्प्यांपैकी आठ टप्प्यात अनेक दिग्गज उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे आता 12 तारखेच्या मतदानानंतर सर्वांना उत्सुकता असेल ती 16 मेच्या निकालाची.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2014 07:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close