S M L

मोदींनी घेतली मोहन भागवत यांची भेट

Sachin Salve | Updated On: May 11, 2014 11:14 PM IST

मोदींनी घेतली मोहन भागवत यांची भेट

8964modi_meet_bhgawat10 मे : लोकसभा निवडणुकीच्या नव्या टप्प्यात प्रचार संपल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

दिल्लीतील संघाच्या कार्यालयात रात्री 10 च्या सुमारास ही भेट झाली. मोदी आणि मोहन भागवत यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकालानंतर काय परिस्थिती निर्माण होईल यावर चर्चा झाली असं सांगण्यात येतंय.

या अगोदर मोदींनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची घरी जाऊन भेट घेतली. तसंच मोदींनी ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचीही भेट घेतली. मोदींनी ट्विटरवर आपण वाजपेयी यांच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली असल्याचं सांगितलंय. प्रचार सुरू होण्याअगोदरही वाजपेयी यांची भेट घेतली होती असंही मोदींनी स्पष्ट केलं. आज संध्याकाळी लोकसभा निवडणुकीसाठी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 12 मे रोजी 41 जागांसाठी मतदान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2014 11:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close