S M L

राजनाथ यांनीही घेतली सरसंघचालकांची भेट

Sachin Salve | Updated On: May 11, 2014 06:07 PM IST

rajnath sing11 मे : लोकसभा निवडणुकीच्या नवव्या टप्प्यात प्रचार संपल्यानंतर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज (रविवारी) सकाळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दिल्लीमधल्या संघाच्या मुख्यालयातच ही भेट झाली.

राजनाथ सिंह बराच वेळ मुख्यालयात होते. त्यांनी भय्याजी जोशी आणि सुरेश सोनी यांचीही भेट घेतली. या निवडणुकीमध्ये भाजपची कामगिरी कशी राहिली याबाबत ही चर्चा झाली तसंच पुढील योजनांबाबतचे मुद्देही उपस्थित झाले असल्याचं कळतंय.

शनिवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास नरेंद्र मोदी यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये मोदी आणि सरसंघचालक यांच्यादरम्यान प्रचारासंबंधी चर्चा झाल्याचं समजतंय. तसंच निकालासंबंधीही चर्चा झाल्याचं कळतं. मोदींनी संघाचे नेते भय्याजी जोशी आणि सुरेश सोनी यांचीही भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2014 03:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close