S M L

वाराणसीत भाजपच्या ऑफिसवर छापा

Sachin Salve | Updated On: May 11, 2014 09:28 PM IST

वाराणसीत भाजपच्या ऑफिसवर छापा

67varansi_bjp_office11 मे : वाराणसी मतदारसंघातल्या निवडणुकीकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. निवडणूक आयोगासह पोलिसही सज्ज झाले आहेत आणि यातच आज (रविवारी) दुपारी पोलिसांनी वाराणसीतल्या भाजपच्या ऑफिसवर छापा टाकला.

भाजपच्या गुलालबाग भागातल्या अर्धवट बांधकाम झालेल्या ऑफिस समोरच्या वाहनात पोलिसांना मोठ्या प्रमाणात प्रचाराचं साहित्य मिळालं असून ते जप्त करण्यात आलंय. या छाप्यामध्ये पक्षाचे झेंडे, टी-शर्ट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. पण, जे सामान जप्त झालं ते प्रचारासाठीचं नव्हतं असं निवडणूक अधिकारी प्रांजल यादव यांनी सांगितलंय. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मात्र आयोग जाणिवपुर्वक अशाप्रकारे कारवाई करत असल्याचं भाजप कार्यकर्त्यांच म्हणणं आहे. पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना वाराणसी सोडण्याचे आदेश दिले आहे. विभागीय आयुक्त लायक सिंग यांनी सांगितलं की, मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर साहित्य कार्यालयावर आण्यात आलंय. हे साहित्य निकालानंतरही पाठवता आले असते पण तसे झाले नाही म्हणून ही कारवाई करण्यात आलीय जर यात काही चुकीचं आढळलं तर कारवाई करण्यात येईल.

मात्र पोलिसांच्या या कारवाईचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. पोलिसांच्या वाहनासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. यावेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्तेही पोहचले त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आपच्याच कार्यकर्त्यांनी हे साहित्य इथं ठेवलं आणि तक्रार केली असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. प्रशासनाच्या या कारवाईचा भाजपच्या नेत्यांनी विरोध केलाय. ही कारवाई भाजपवर दबाव निर्माण करण्याच्या हेतूनेच करण्यात आली त्यामुळे कार्यकर्ते बाहेर पडणार नाही असा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्या मिनाक्षी लेखी यांनी केला. पण, जे सामान जप्त झालं ते प्रचारासाठीचं नव्हतं असं निवडणूक अधिकारी प्रांजल यादव यांनी सांगितलंय. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2014 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close