S M L

'गद्दारी' वक्तव्यावरुन केजरीवालांना आयोगाची नोटीस

Sachin Salve | Updated On: May 11, 2014 06:34 PM IST

'गद्दारी' वक्तव्यावरुन केजरीवालांना आयोगाची नोटीस

57kejriwal_ec11 मे : ऐन मतदानाच्या पूर्व संध्येला वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपाखाली नोटीस बजावली आहे.

केजरीवाल यांनी 2 मे रोजी अमेठी इथं झालेल्या सभेत जे काँग्रेस किंवा भाजपला मतदान करतील, ते देशाची फसवणूक करतील, देशासोबत गद्दारी करतील असं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याची दखल घेऊन आयोगाने नोटीस बजावली आहे. 13 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत् उत्तर देण्याचे आदेशही आयोगाने दिले आहे.

अमेठी मतदारसंघात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आपचे नेते कुमार विश्वास निवडणूक लढवत आहे. कुमार विश्वास यांच्या प्रचार सभेत केजरीवाल यांनी हजेरी लावली होती. अमेठीतील लोक जर काँग्रेसला मतदान करत असेल तर वाईट वाटून घेऊ नका पण ही देशासोबत गद्दारी असेल. इथं काँग्रेस किंवा भाजपला मतदान केलं तर देवासोबत आणि देशासोबत गद्दारी असेल असं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं होतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2014 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close