S M L

अजय राय यांच्याविरोधात FIR दाखल

Samruddha Bhambure | Updated On: May 12, 2014 06:11 PM IST

अजय राय यांच्याविरोधात FIR दाखल

ajay ray12 मे : वाराणसी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी 'हात' दाखवल्यामुळे गोत्यात आले आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजय राय यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. आयोगाच्या आदेशानंतर वाराणसी पोलिसांनी आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल केला. राय यांच्याविरोधात कलम 126 आणि 130 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आज (सोमवारी) सकाळी अजय राय मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेले होते. यावेळी त्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे शर्टावर पक्षाचं चिन्ह लावलं होतं. अजय राय यांनी पक्षाच्या चिन्हासोबत मतदान केंद्रात जाऊन हक्क बजावला. पक्षाचं चिन्ह लावल्यामुळे भाजपने यावर आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात पक्षाचे चिन्ह अथवा प्रचार करता येत नाही असं असतानाही राय यांनी नरेंद्र मोदींची नक्कल करुन अडचण ओढावून घेतलीय. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर प्रथमदर्शी अजय राय दोषी असल्याचं आढळून आलंय. वाराणसीतील निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी राय यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यांनंतर वाराणसी पोलिसांना गुन्हा दाखल केलाय. बडोद्यामध्ये नरेंद्र मोदी यांनीही शर्टावर पक्षाचे चिन्ह लावून मतदानाचा हक्क बजावला होता आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षाचे चिन्ह हातात घेऊन संवाद साधला होता. मोदींनी 'कमळ' दाखवल्यामुळे काँग्रेसने याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आता वाराणसीत अजय राय यांनी 'हात' दाखवल्यामुळे भाजपने हिशेब चुकता केलाय.

दरम्यान, वाराणसीजवळच्या चंदौली मतदारसंघात एक वेगळाच प्रकार दिसून येतोय. इथं निवडणूक अधिकार्‍यांनी जे लॅपटॉप्स वापरले त्यावर अखिलेश आणि मुलायम यादव यांचे फोटो आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2014 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close