S M L

नितीन गडकरी पुन्हा अध्यक्षपदी ?, पण संघाचा रेड सिग्नल

Sachin Salve | Updated On: May 13, 2014 09:44 PM IST

nitin gadkari13 मे : आयकर खात्याने क्लीन चिट दिल्यानंतर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी पुन्हा सक्रीय झाले आहे. आज मंगळवारी गडकरी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची भेट घेतली. सोमवारीच आयटीनं गडकरींना क्लीन चिट दिलीय. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय.

गडकरी भाजप अध्यक्षपदासाठी पुन्हा प्रयत्नशील आहेत. गेल्या 2 दिवसात गडकरींनी मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतलीय. पण संघ परिवाराने अध्यक्षपदासाठी गडकरींच्या नावाला विरोध केला आहे. राजनाथ सिंगच भाजपच्या अध्यक्षपदी कायम राहतील असं संघाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

भाजपची रणनीती ठरवण्यासाठी गांधीनगरमध्ये भाजप नेत्यांची उद्या बुधवारी संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजप नेते नरेंद्र मोदी, राजनात सिंह, अरुण जेटली आणि गडकरी उपस्थित राहतील. गडकरींना आयकर विभागाने क्लिन चीट दिली. गडकरींविरूद्ध कुठलीही चौकशी सुरू नाही, त्यांच्या विरूद्ध कुठलीही चौकशी झाली नाही किंवा प्रलंबितही नाही असं आयकर विभागाने स्पष्ट केलंय. गडकरींचं नाव भाजपच्या अध्यक्षपदासाठी दुसर्‍यांदा चर्चेत असताना गडकरींच्या पूर्ती उद्योगसमूहाबाबत अनेक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. या आरोपांमुळे गडकरींना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2014 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close