S M L

भाजपच्या अध्यक्षपदाची पुन्हा इच्छा नाही -गडकरी

Sachin Salve | Updated On: May 13, 2014 09:52 PM IST

भाजपच्या अध्यक्षपदाची पुन्हा इच्छा नाही -गडकरी

4754gadkari13 मे : भाजपचं अध्यक्षपद पुन्हा मिळवण्याचा कोणताही विचार नाही, मी अगोदर तीन वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष राहिलो आहे त्यामुळे आता याची काही चर्चा होत असेल तर त्याला अर्थ नाही असं भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी आयबीएन-नेटवर्कशी बोलताना स्पष्ट केलं.

आम्हाला बहुमत मिळेल हे स्पष्ट आहे पण जर असं झालं नाही तर ज्यांना एनडीएमध्ये येण्याची इच्छा आहे त्यांना एनडीएचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. एनसीपी, बसपा किंवा इतर कोणताही पक्ष असेल त्यानी एनडीएमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर विचार करण्याची तयारी आहे असे संकेतही गडकरी यांनी दिले.

तसंच आजकाल कुणीही कुणावर आरोप करतो ते आरोप का करण्यात आले यामागे त्यांचा वेगळा हेतू असू शकतो पण या आरोपातून आपण मुक्त झालो याचं समाधान आहे असंही गडकरी म्हणाले. आयकर खात्याने क्लीन चिट दिल्यानंतर नितीन गडकरी पुन्हा अध्यक्ष होतील अशी चर्चा होती सुरू झाली होती. आज मंगळवारी सकाळी गडकरी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची भेट घेतली. सोमवारीच आयटीनं गडकरींना क्लीन चिट दिलीय. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय. गडकरी भाजप अध्यक्षपदासाठी पुन्हा प्रयत्नशील आहेत.

गेल्या 2 दिवसात गडकरींनी मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतलीय. पण संघ परिवाराने अध्यक्षपदासाठी गडकरींच्या नावाला विरोध केला. राजनाथ सिंगच भाजपच्या अध्यक्षपदी कायम राहतील असं संघाकडून स्पष्ट करण्यात आलंय. भाजपची रणनीती ठरवण्यासाठी गांधीनगरमध्ये भाजप नेत्यांची उद्या बुधवारी संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजप नेते नरेंद्र मोदी, राजनात सिंह, अरुण जेटली आणि गडकरी उपस्थित राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2014 07:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close