S M L

पराभवाला पक्षच जबाबदार, काँग्रेसची तयारी

Sachin Salve | Updated On: May 13, 2014 08:54 PM IST

पराभवाला पक्षच जबाबदार, काँग्रेसची तयारी

56congress_413 मे : लोकसभा निवडणुकीच मतदान संपल्यानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांनी पोस्ट पोल सर्व्हेमध्ये मोदी सरकार येईल असा अंदाज व्यक्त केलाय जर हे अंदाज खरे ठरले तर काँग्रेसचं भवितव्य काय असेल असा प्रश्न आता निर्माण झाला. हा अंदाज खरा ठरला तर काँग्रेसला खरोखरच धोबीपछाड मिळेल.

आयबीएन नेटवर्क-आणि सीएसडीएसच्या पोस्ट पोल सर्व्हेनुसार काँग्रेसला केवळ लोकसभेच्या 100 जागा मिळतील असा अंदाज आहे. ही आतापर्यंतची काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी आहे. निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आल्यानंतर आता मुख्य प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे यासाठी दोषी कोणाला मानायचं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींना पराभवासाठी जबाबदार धरण्यापेक्षा संपूर्ण पक्षच पराभवाची जबाबदारी घ्यावी, राहुल गांधींचं नेतृत्व किंवा सरकारची कामगिरी असं, सोनिया गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचं कळतंय. राहुल गांधी टार्गेट होऊ नये म्हणून सरकारचा पराभव झाला हा मुद्दा अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात पक्ष कमी पडला असं सांगण्यात येतंय. पक्ष याच भूमिकेवर ठाम राहील. यानंतर काही पदांमध्ये बदल होतील. पण नेतृत्वाला धक्का बसणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2014 08:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close