S M L

मोदींसाठी अमेरिकेकडून रेड कार्पेट, व्हिसा मिळणार?

Samruddha Bhambure | Updated On: May 14, 2014 04:04 PM IST

मोदींसाठी अमेरिकेकडून रेड कार्पेट, व्हिसा मिळणार?

14 मे :  अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्यानुसार राष्ट्रप्रमुखांना ए - 1 व्हिसा मिळतो त्यामुळे पंतप्रधान झाल्यास नरेंद्र मोदींनाही हा व्हिसा मिळणार आहे. अमेरिकेच्या गृहविभागाचे प्रवक्त्या जेन पास्की यांनी ही माहिती दिली आहे. 2005 मध्ये अमेरिकेने नरेंद्र मोदींना व्हिसा नाकारला  होता पण आता मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनादेखील अमेरिकेचा व्हिसा मिळेल असे संकेतच पास्की यांनी दिल्याचे सांगितले जाते.

लोकसभा निवडणुकीच्या पोस्ट पोल सर्व्हे, एक्झिट पोल सर्व्हेनुसार मोदींचं सरकार येणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेनेही मोदींविषयी भूमिकेत बदल केल्याचे दिसत आहे. नवीन सरकारसोबत आम्ही काम करण्यास तयार आहोत असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले होते. त्यापाठोपाठ अमेरिकेच्या गृहविभागाच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनीदेखील मोदींना व्हिसा देण्याचे संकेत दिले. अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड नॅशनालिटी अ‍ॅक्टनुसार कोणत्याही देशाच्या राष्ट्रध्यक्षाला अमेरिकेचा व्हिसा मिळतोच असं त्या म्हणाल्य.

दरम्यान, 2002 च्या गुजरात दंगलींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने यापूर्वी मोदींना व्हिसा नाकारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2014 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close