S M L

भाजपची मोर्चेबांधणी सुरू

Sachin Salve | Updated On: May 14, 2014 01:08 PM IST

भाजपची मोर्चेबांधणी सुरू

14 मे : लोकसभा निवडणुकीसाठी निकालाला फक्त दोन दिवस राहिले असताना पुढची रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या चर्चा आणि बैठकींना वेग आला आहे. गांधीनगरमध्ये भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

सत्तास्थापनेनंतर जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं कळतंय. राज्यातही भाजपच्या कार्यकारणिची बैठक सुरू आहे. भाजपची बैठक आज (बुधवारी) दुपारी साडेचार वाजता गांधीनगरमध्ये होणार आहे. त्यापूर्वी दिल्लीमध्ये नेत्यांच्या गाठीभेटींचं सत्र सुरू झालंय.

मावळत्या लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज या गेल्या काही दिवसांपासून पक्षात एकाकी पडल्याचं चित्र आहे. पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांमध्येही त्या फारशा दिसत नाहीत. आज गांधीनगरमधल्या बैठकीला त्यांनी उपस्थित राहावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतली, त्यानंतर पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह त्यांना भेटायला गेलेत. दुसरीकडे नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अमित शाह यांनी अरुण जेटली यांची भेट घेतली.

कुणाला कोणतं मंत्रिपद मिळू शकतं ?

  • - अरुण जेटली - अर्थ किंवा परराष्ट्र खातं
  • - मुरली मनोहर जोशी - परराष्ट्र विभाग किंवा अर्थ
  • - राजनाथ सिंह - गृह
  • - सुषमा स्वराज - संरक्षण
  • - जन. व्ही.के. सिंग - संरक्षण राज्य मंत्री
  • - नितीन गडकरी - रेल्वे किंवा पायाभूत सुविधा, गडकरी गृहखात्यासाठी आग्रही असल्याचीही माहिती
  • - राम विलास पासवान - आरोग्य किंवा कृषी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2014 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close