S M L

भाजपची लगीनघाई , अडवाणींना लोकसभेचं अध्यक्षपद?

Samruddha Bhambure | Updated On: May 15, 2014 03:35 PM IST

भाजपची लगीनघाई , अडवाणींना लोकसभेचं अध्यक्षपद?

15 मे :  पोस्ट पोल सर्व्हेमध्ये भाजपप्रणीत एनडीएची सत्ता येईल असा अंदाज वर्तवले जात असतानाच सत्ता स्थापनेच्या दिशेनं भाजपच्या हालचाली सुरू आहेत. संघाचे नेते सुरेश सोनी यांनी थोड्या वेळापूर्वी राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

मोदी सत्तेवर आल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात आडवाणींना स्थान देण्यात येणार नसल्याचे समजते. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे आता नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी अडवाणींचा लोकसभा अध्यक्षपदासाठी विचार सुरु आहे.

लालकृष्ण अडवाणी हे सध्या नाराज आहेत. काल गांधीनगरमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीला लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज उपस्थित नव्हते. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मीडियासमोर तरी ही बाब फारशी गंभीर नसल्याचं भासवलं.

दरम्यान, 'केंद्रात भाजप सत्तेवर आल्यास लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेविषयी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल,' असं भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2014 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close