S M L

राहुल गांधी दिल्लीत परतले, काँग्रेसचा जीव भांड्यात

Sachin Salve | Updated On: May 15, 2014 08:08 PM IST

राहुल गांधी दिल्लीत परतले, काँग्रेसचा जीव भांड्यात

15 मे : लोकसभेच्या निकालाला काही तास उरले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निरोप समारंभाला गैरहजर राहिलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आता दिल्लीत परतले आहे. पंतप्रधानांना 'बाय बाय' न करता राहुल गांधी विदेश दौर्‍याला निघून गेले होते त्यामुळे त्यांच्यावर एकच टीकेची झोड उठली होती. अखेर आज संध्याकाळी राहुल गांधी परतल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

गेली दहा वर्ष देशाचे पंतप्रधानपद भुषवणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बुधवारी संध्याकाळी दिल्लीत दस जनपथवर निरोप देण्यात आला. पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निरोप समारंभाचं आयोजन केलं होतं. पण या निरोप समारंभाला राहुल गांधी यांनी दांडी मारली होती. राहुल गांधी परदेशात गेल्याचं सांगण्यात आलं होतं. राहुल गांधी विदेश दौर्‍याला निघून गेल्यामुळे विरोधकांना एकच टीका केली. राहुल गांधी हे विदेशी पर्यटक असून देशात ते सुट्टीवर येतात अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

तर एक्झिट पोलने कौल दिल्यामुळे मीडियापासून वाचण्यासाठी राहुल विदेशात जाऊन बसले अशी टीका भाजपचे प्रवक्ते शाहनावज हुसेन यांनी केली. अखेर या वादळानंतर राहुल गांधी आता दिल्लीत परतले आहे. उद्या निकाल जर एनडीएच्या बाजू लागणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी निकालाच्या दिवशी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतील आणि पराभव मान्य करतील का ? असा सवाल उपस्थित झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2014 08:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close