S M L

' आयपीएल लाईफ बना दे ' कॉन्टेस्टच्या विजेत्याची गोदरेज कंपनीने केली फसवणूक

10 एप्रिल, ठाणेअलका धुपकर तुम्ही कधी आयपीएलसंबंधातल्या कॉन्टेस्टला एसएमएसवरून उत्तर पाठवलीयत... हजारो क्रिकेटवेड्यांचे लाखो एसएमएस आयपीएलच्या लाईफ बना दे कॉन्टेस्टसाठी गेले असतील. त्यात तुमचाही असेल. तुम्ही त्याचे विजेते ठरला नाहीत हे नशीब समजा. कारण यात विजेते ठरलेले नवी मुंबईचे डॉ. निलेश देवरे गोदरेजसोबत कायदेशीर लढाई लढतायत. या स्पर्धेच्या बक्षिसात गोदरेजने त्यांना फसवल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयपीएलची लाईफ बनादे कॉन्टेस्ट... त्यात नवी मुंबईतल्या डॉ. निलेश देवरेने करोडपती फ्लॅट विजेतेपदाचा मान पटकवलेला. पण दहा महिन्यांनी गोदरेज प्रॉपर्टीकडून त्याला एक कोटीच्या फ्लॅटऐवजी 20 लाख रुपयांत सेटलमेंटची ऑफर देण्यात आली. डॉ. निलेश देवरे, करोडपती फ्लॅटचा विजेताच्या शब्दात, "गोदरेजच्या लोकांनी 31 मार्चला मला सांगितलं की तू 20 लाख घे तसं कबूल असल्याचं तू लेखी लिहून दे आणि आपण मॅटर सॉल्व करू म्हणू...गोदरेजकडून ही अपेक्षा कधीच नव्हती."निलेश मात्र फ्लॅटसाठी ठाम राहिला. कारण, करारानुसार, एक कोटीचा फ्लॅट किंवा एक कोटीची रोख रक्कम गोदरेज प्रॉपर्टीने त्याला दिली पाहिजे. मग गोदरेजने त्याला ठाण्यात फ्लॅट ऑफर केला...त्यासंदर्भातली माहिती काढल्यावर निलेशला धक्काच बसला. डॉ. निलेश देवरे, करोडपती फ्लॅटचा विजेता म्हणतो की, "गेल्या वर्षभरात गोदरेजने केलेल्या 17 डील्सची माहिती मी काढली आणि रजिस्ट्रेशन ऑफीसमधून कळलं की, ते मला जो फ्लॅट देतायत. त्याच्या बाजूचाच वन बीचएचके फक्त 27 लाख रुपयांना गेलाय....मग याची किंमत एक कोटी असूच शकत नाही.." मानपाडा, ठाणे इथल्या गोजरेज इडनवुडसच्या या अपार्टमेंटमध्ये निलेशला एक कोटीचा फ्लॅट देण्यात आला आहे. त्याच्यावर त्याला 35लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागणार आहे. पण निलेशच्या म्हणण्यानुसार, या फ्लॅटची किंमत एक कोटी नाही तर 50 लाखाच्याही आत आहे. निलेशचे वकील ऍड अशोक सरोगी यांनी गोदरेजला कायदेशीर नोटसच पाठवलीय. या संदर्भात गोदरेज प्रॉपर्टीनंही स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, सोनी सेट मॅक्सने घेतलेली आयपीएल लाईफ बना दे कॉन्टेस्ट गोदरेज प्रॉपर्टीने स्पॉन्सर केलेली. त्यामुळे गोदरेजने केलेल्या दाव्यानुसार ठाण्यातल्या मानपाडा भागातल्या ईडनवूड्स प्रोजक्टमधल्या वन बीएचकेची किंमत एक कोटी असल्याचा कायदेशीर पुरावा त्यांना सादर करावा लागेल. आयबीएन लोकमतला गोदरेज प्रॉपर्टीजने त्याचं स्पष्टीकरण ईमेलद्वारे पाठवलंय. या ईमेलमध्ये डॉ. निलेश देवरे यांनी केलेले सर्व आरोप गोदरेजने फेटाळलेत. गोदरेजच्या मते हा वन बीएचके एक कोटीचा आहे. सर्व करांसहित याची किंमत आहे 88 लाख 29 हजार 750 रुपये.यावर ऍड. अशोक सरोगी, निलेश देवरेचे वकील म्हणाले, ' याचं उत्तर आठ दिवसांत त्यांनी दिलं नाही तर आम्ही क्रिमिनल प्रोसिडिंग करणार गोदरेजसारखी नावाजलेली आणि लोकांचा विश्वास संपादन केलेली कंपनीही जेव्हा अशी कायद्याच्या कचाट्यात अडकली जाते, तेव्हा अशा कॉन्टेस्ट या क्रिकेटफॅन्सना फसवण्यासाठीच असतात की काय अशी शंका येते.'

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2009 08:26 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2009 08:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close