S M L

दिल्लीत पुन्हा 'आप'चं सरकार?

Samruddha Bhambure | Updated On: May 18, 2014 04:13 PM IST

दिल्लीत पुन्हा 'आप'चं सरकार?

IN08_KEJRIWAL_1713960f18 मे : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आपच्या आमदारांनी दिल्लीत पुन्हा स्थापन करण्याची मागणी पक्ष नेत्यांकडे केली आहे. काँग्रेसचा पाठिंबा घेऊन दिल्लीत पुन्हा सरकार स्थापन करा, अशी मागणी या आमदारांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर आपच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची मागणी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.  पण पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा कल पुन्हा निवडणूक घेण्याकडे आहे. यावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काँग्रेसनंही यावर अजून विचार करायला सुरूवात केलेली नाही आहे.

दिल्लीत आपचे २८ आमदार असून भाजपचे ३२ आमदार आहेत. तर काँग्रेसचे सात आमदार निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी ३६ ची मॅजिक फिगर गाठणे गरजेचे असते. डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यावर आपने काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सत्तास्थापन केली होती. मात्र अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरुन ४९ दिवसांत सत्तेवरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2014 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close