S M L

काँग्रेस कार्यकारिणी राजीनाम्याच्या तयारीत?

Samruddha Bhambure | Updated On: May 19, 2014 07:18 PM IST

sonia-and-rahul_350_08051301012119 मे :  काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. पराभवाची सामूहिक जबाबदारी घेत राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समितीची बैठक आज दुपारी 4 वाजता होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर चिंतन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. तिकीट वाटप आणि प्रचाराची रणनिती आखण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांच्या टीमकडे होतं. त्यांच्या सल्लागारांविरोधात पक्षांतर्गत रोष आहे. त्यांच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित केल्या जाताहेत. मात्र, राहुल गांधी यांच्यावर दोषारोप होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाते आहे. त्यामुळे देशात काँग्रेसच्या पराभवाचं खापर राहुल गांधींच्या डोक्यावर फुटण्याची शक्यता कमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2014 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close