S M L

समाजवादी पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध

11 एप्रिल समाजवादी पक्षाने आज पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. त्यावेळी अध्यक्ष मुलायमसिंग, सरचिटणीस अमरसिंह आणि इतर सपा नेते उपस्थित होते. त्यात मुस्लिमांसह अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना आयआयटी, आयआयएम आणि मेडिकल कॉलेजमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं. तसंच, सरकारी नोकरीतल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादा 40 करण्यात आलीय. भाजपचा इंडिया शायनिंगचा अजेंडा आणि काँग्रेसच्या आम आदमीच्या अजेंड्यावर टीका करत सपाने शाळा-कॉलेजमध्ये इंग्रजी शिक्षणावर सक्तीचं करणार नाही, कॉम्प्युटरचा कमीत कमी वापर करण्याला प्रोत्साहन देण्याचंही आश्वासन यात दिलं. तसंच शेतक-यांच्या विकासासाठी 8 कलमी योजना आखण्याचंही आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात दिलंय. दहशतवादाचा सामना करण्याच्या आश्वासनासोबतच भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांतील संबंध सुधारण्यावर भर देणार असल्याचं सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2009 10:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2009 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close