S M L

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घुमला ठाकरेंचा आवाज !

Sachin Salve | Updated On: May 20, 2014 06:57 PM IST

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घुमला ठाकरेंचा आवाज !

20 मे : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज पहिल्यांदाच ठाकरे घराण्याचा आवाज घुमला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन करण्यासाठी एनडीएचे मित्र पक्ष एकत्र जमले होते त्यावेळी शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचं अभिनंदन केलं.

आज काय बोलावं हे सुचतं नाही, ज्याचं स्वप्न आपण पाहिलं होतं ते सत्यात उतरलंय. एनडीए आणि शिवसेनेची युती 25 वर्षांची आहे. प्रत्येक क्षणी आपण अनेक गोष्टींसाठी लढा दिला आणि आज 'अच्छ दिन आये है' असं मत उद्धव यांनी व्यक्त केलं. तसंच या आनंदाच्या क्षणी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. त्यांनी जो मार्ग दाखवला त्यावर आपण चालत आहोत असं सांगता उद्धव भावूक झाले.

गेल्या 25 वर्षांपासून सेना आपल्या सोबत होती आणि कायम आपल्या सोबत राहिलं ा्रत्येक पावलावर तुम्हाला शिवसेनेची साथ देईल अशी ग्वाहीही उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांच्यानंतर चंद्राबाबू नायडूंनी मोदींच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला. तर एनडीएला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या, मोदींच्या समर्थ नेतृत्त्वामुळेच हा चमत्कार घडला असं लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2014 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close