S M L

'आप'चं पुन्हा 'चलो दिल्ली', केजरीवाल घेणार दिल्लीकरांचा कौल

Sachin Salve | Updated On: May 20, 2014 10:45 PM IST

'आप'चं पुन्हा 'चलो दिल्ली', केजरीवाल घेणार दिल्लीकरांचा कौल

20 मे : लोकसभा निवडणुकीत 'आप'टलेल्या आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. दिल्लीत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करावी अशी आम आदमी पक्षातल्या काही आमदारांची इच्छा आहे. त्याबद्दल त्यांनी केजरीवाल यांच्याकडे तशी मागणीही केलीय. आता यासाठी आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी आज (मंगळवारी) नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतलीय.

सत्ता स्थापन करायची की नाही याबद्दल जनतेचा कौल घेऊ यासाठी आठवड्याभराची मुदत द्यावी अशी मागणी केजरीवाल यांनी केली. मात्र दुसरीकडे काँग्रेसने पुन्हा केजरीवाल यांना पाठिंबा देणार नाही असं स्पष्ट केलंय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला 28 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी 36 चा आकडा गाठणे गरजेचं आहे. भाजपने सत्ता स्थापनेसाठी नकार दिला होता तेव्हा आपने काँग्रेससोबत घरोबाकरुन सत्ता स्थापन केली होती पण ही सत्ता फक्त 49 दिवसच टिकू शकली. केजरीवाल यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. आप लोकसभेसाठी सर्वच जागांसाठी मैदान उतरली. खुद्ध केजरीवाल वाराणसीतून भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रिंगणात उतरले. पण केजरीवाल चांगलेच 'आप'टले.

केजरीवाल यांचा वाराणसीत पराभव झाला. तर देशभरात आपच्या सर्वच उमेदवारांचा डिपॉझिट जप्त होईल असा पराभव झाला. त्यातून केजरीवाल मात्र वाचले. 'आप'ला फक्त या निवडणुकीत केवळ पंजाबमध्ये यश मिळवता आलंय. पंजाबमध्ये 4 जागा आपच्या पदरात पडल्या आहे. पण सत्ते राहावं यासाठी आपने पुन्हा 'चलो दिल्ली'चा नारा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2014 10:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close