S M L

'मोदी सरकार'मध्ये सेनेला हवी 2 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं ?

Sachin Salve | Updated On: May 20, 2014 11:01 PM IST

'मोदी सरकार'मध्ये सेनेला हवी 2 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं ?

20 मे : येत्या 26 मे रोजी भाजपचे नेते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.आज (मंगळवारी) मोदींनी सरकार स्थापन करण्याचा राष्ट्रपतींना भेटून दावा केलाय. पण मोदी सरकारमध्ये कुणाला कोणतं खातं मिळू शकतं, याची चर्चा सध्या सुरू आहे. पण, मंत्रिमंडळ छोटं ठेवण्यावर मोदींचा भर असल्याचं कळतंय.

तर एनडीएचा 25 वर्षांपासून मित्र असलेल्या शिवसेनेनं आपल्या पदरात काही तरी पडावं यासाठी भाजपकडे मागणी केलीय. शिवसेनेनं 2 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. खुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दिल्ली होते. पण, अजून कुणाचीही नावं निश्चित झालेली नाही असं सांगण्यात आलंय.

संभाव्य खातेवाटपानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांना गृह मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे तर अरुण जेटली यांना अर्थ किंवा परराष्ट्र खातं, नितीन गडकरींना पायाभूत सुविधा, मुरली मनोहर जोशींना मनुष्यबळ विकास, रविशंकर प्रसाद यांना कायदे मंत्रालय, डॉ. हर्ष वर्धन यांना आरोग्य मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. तर स्मृती इराणी यांनाही महत्वाचं खातं मिळण्याची शक्यता आहे.

टीम मोदींचं संभाव्य खातेवाटप

  • -राजनाथ सिंह - गृह मंत्रालय
  • -अरुण जेटली - अर्थ किंवा परराष्ट्र
  • -नितीन गडकरी - पायाभूत सुविधा
  • -मुरली मनोहर जोशी - संरक्षण
  • -सुषमा स्वराज - मनुष्यबळ विकास
  • -रविशंकर प्रसाद - कायदे मंत्रालय
  • -डॉ. हर्षवर्धन - आरोग्य मंत्रालय
  • स्मृती इराणींना महत्त्वाचं खातं मिळण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2014 11:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close