S M L

दिल्लीत पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार -केजरीवाल

Samruddha Bhambure | Updated On: May 21, 2014 05:23 PM IST

दिल्लीत पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार -केजरीवाल

21 मे :  लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर आता आम आदमी पार्टी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उत्सुक आहे. अनेक दिवसांपासून आप पुन्हा सत्तेवर येईल अशी चर्चा सुरू होती. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीकरांची जाहीर माफी मागत पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास केजरीवाल यांच्या निवासस्थानी आपच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारल्यानंतर आता दिल्लीत पुन्हा सत्ता स्थापन करावी, अशी आम आदमी पक्षातल्या काही नेत्यांची इच्छा आहे. पण दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला पाठिंबा देणार नाही, असं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. आपचे समन्वयक केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी आज नायब राज्यपालांची भेट घेतली.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याबद्दल मी दिल्लीच्या जनतेची जाहीर मागतो. गेल्या 5-6 महिन्यांत आम्ही देशभर फिरलो, आमच्याविषयी लोकांमध्ये नाराजी आहे. आम्ही पळून गेलो असं लोकांना वाटतं. सध्याच्या स्थितीत दिल्लीत सत्ता स्थापन करणे अशक्य असल्याने आम्ही निवडणुका लढवण्यासाठी तयार आहोत. आता परत जनतेसमोर जाऊ आणि निवडणुकीत बहुमत मिळवून दिल्लीकरांना स्थिर सरकार देऊ असं केजरीवालांनी स्पष्ट केलंय.

'आप'ला या निवडणुकीत केवळ पंजाबमध्ये यश मिळवता आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2014 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close