S M L

आता बोला, देशभरात 21 बोगस विद्यापीठं !

Sachin Salve | Updated On: May 21, 2014 10:22 PM IST

आता बोला, देशभरात 21 बोगस विद्यापीठं !

21 मे : यूजीसी म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने देशभरातल्या बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यात देशभरातल्या एकूण 21 विद्यापीठांचा समावेश असून त्यात महाराष्ट्रातलं एक विद्यापीठ आहे. नागपूरच्या 'राजा अरेबिक युनिव्हर्सिटी' यूजीसीच्या गुणवत्तेत नापास झालीय. तर उत्तर प्रदेशात सर्वात जास्त 9 बोगस विद्यापीठं सापडली आहे.

विद्यार्थ्यांना खोटी आश्वासनं देऊन प्रवेश देणं आणि पैसे उकळणं असे फसवणुकीचे प्रकार घडत असल्याने यूजीसीनं ही यादी जाहीर केली आहे. तीन वर्षांपूर्वी खासगी विद्यापीठांना रान मोकळे करुन देण्यात आले होते. त्यानंतर देशभरात अनेक खासगी विद्यापीठांनी आपले बस्तान मांडले होते.

अनेक ठिकाणी पैशांच्या लालसे पोटी बोगस विद्यापीठाच्या घटना समोर आल्या होत्या. विद्यार्थ्यांकडून फीचे पैसे वसूल करून पदवीच न देण्याचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर युजीसीनेच आता बोगस विद्यापीठाची यादी जाहीर करुन टाकली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2014 10:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close