S M L

आनंदीबेन पटेल यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Samruddha Bhambure | Updated On: May 22, 2014 04:35 PM IST

आनंदीबेन पटेल यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

22 मे : गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुजरात विधानसभेत हा सोहळा पार पडला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेते राजनाथ सिंह आणि नितीन गडकरीही हजर होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते केशुभाई पटेलही या समारंभाला हजर होते. विशेष म्हणजे जेव्हा केशुभाई पटेल यांचं आगमन झालं, तेव्हा मोदी मंचावरून खाली उतरून त्यांना आणण्यासाठी गेले.

गुजरातचे तब्बल 13 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहणारे नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विधीमंडळाच्या बैठकीत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आनंदीबेन पटेल यांनी निवड करण्यात आली. पहिल्यांदाच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी एखाद्या महिलेची निवड करण्यात आली.  आनंदीबेन पटेल यांचं नाव सुरुवातीपासून चर्चेत होतं अखेर  काल त्यावर शिक्कामोर्तब झालं असून गुजरातला आनंदीबेन पटेल या पंधराव्या मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी आनंदीबेन पटेल यांचं अभिनंदन केलं असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिला आहेत.

आनंदीबेन पटेल यांचं अल्पपरीचय

 • - आनंदीबेन जेठाभाई पटेल
 • - जन्म 21 नोव्हेंबर 1941
 • - 1998 पासून गुजरातमध्ये आमदार
 • - अहमदाबादमधल्या मंडलमधून आमदार म्हणून निवडून आल्या
 • - 1987 पासून भाजपच्या सदस्य
 • - सध्या त्यांच्याकडे रस्ते आणि इमारत, नगरविकास, गृहनिर्माण, आपत्ती व्यवस्थापन ही खाती होती
 • - मोदींच्या सरकारमधल्या महत्त्वाच्या मंत्री
 • - गेल्या 4 वेळा त्या आमदार म्हणून निवडून आल्यायत
 • - गुजरात सरकारमधल्या एकमेव महिला मंत्री
 • - 1994 मध्ये गुजरातमधून राज्यसभेच्या खासदार
 • - मेहसाना जिल्ह्यातल्या विजापूर तालुक्यातल्या खारोड गावात जन्म
 • - जिल्ह्यात इतर शाळा नसल्यानं 700 विद्यार्थ्यांच्या मुलांच्या शाळेत एकटी मुलगी शिक्षण घेणारी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2014 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close