S M L

योगेंद्र यादवांची जामिनावर सुटका, केजरीवालांचा मुक्काम जेलमध्येच !

Sachin Salve | Updated On: May 22, 2014 09:59 PM IST

योगेंद्र यादवांची जामिनावर सुटका, केजरीवालांचा मुक्काम जेलमध्येच !

22 मे : नितीन गडकरी मानहानी खटला प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांची कोर्टाने 5 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. पण दुसरीकडे केजरीवाल यांनी जामीन घेण्यास नकार दिलाय. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याविरोधात निदर्शनं केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री यादव यांच्यासह जवळपास 60 जणांना अटक करण्यात आली होती.

पण, ही अटक बेकायदा असल्याचे यादव यांच्या वकिलांनी आज कोर्टात सांगितलं. तुरुंगाबाहेर जमावबंदीचे आदेश लागू होते, हे कुणालाच सांगण्यात आलेलं नव्हतं असंही त्यांनी कोर्टात सांगितलं.

दरम्यान, अरविंद केजरीवाल मात्र अजूनही तिहार तुरुंगातच आहेत. नितीन गडकरींनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात जामीन भरायला नकार दिल्याने केजरीवाल यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आता त्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाईल. तेव्हाही न्यायाधीशांनी जामीन भरायला सांगितला तर वरच्या कोर्टात जाऊ, असं आपचे नेते प्रशांत भूषण यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2014 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close