S M L

मोदींना आईकडून 101 रुपयांचा शगुन !

Sachin Salve | Updated On: May 22, 2014 07:20 PM IST

मोदींना आईकडून 101 रुपयांचा शगुन !

22 मे : 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी' असं उगाचं म्हटलं जात नाही. नरेंद्र मोदी आता लवकरच देशाचे पंतप्रधान होणार आहे पण मोदी यांनी या शुभकार्याला सुरुवात करण्याअगोदर आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन दिल्लीकडे कूच केलीय. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदातून मुक्त झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी गांधीनगरमध्ये आपल्या आईची भेट घेतली. त्यांच्या आईनी गोडधोड खाऊ घालून शुभशकुन म्हणून 101 रुपयांची भेट दिली आणि चांगलं काम करं असा आशीर्वादही त्यांनी दिला. आई आणि मुलाचं प्रेम पाहून तिथे उपस्थिती असलेले सर्वच जण थक्क झाले.

देशाच्या इतिहासात मोदी नावाच्या वादळाने घवघवीत यश मिळवून दाखवलं. येत्या सोमवारी संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. पंतप्रधान होण्याअगोदर मोदींना गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. गेली तीन दिवस मोदी आपल्या गुजरातमध्ये राहुन पदत्यागाची सोयीस्कर पार पाडली. गुजरातच्या मुख्यमंत्री आता आनंदीबेन पटेल यांनी नियुक्ती करण्यात आलीय. गुजरातचा निरोप घेण्याअगोदर नेहमी प्रमाणे नरेंद्र मोदी यांनी आपली आई हिराबा यांची गांधीनगरमध्ये भेट घेतली.

कोणतही मोठं काम करण्याअगोदर मोदी नेहमी आपल्या आईची पहिली भेट घेतात. लोकसभेत विजय मिळवल्यानंतर मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. आज गुजरात सोडण्याअगोदर मोदींनी आईची भेट घेण्यासाठी घरी दाखल झाले. यावेळी त्यांच्या आईनी शुगन म्हणून 101 रुपयांची भेट दिली. आईचा आशीर्वाद घेऊन मोदी आता दिल्लीकडे रवाना झाले आहे. सोमवारी ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2014 07:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close