S M L

प्रवीण महाजन यांच्या आरोपांचं महाजन कुटुंबियांकडून खंडन

13 एप्रिल प्रमोद महाजनांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला त्यांचा भाऊ प्रवीण महाजन यांनी त्यांच्या 'माझा अल्बम' या लवकरच प्रकाशित होणार्‍या पुस्तकामधून प्रमोद महाजनांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पण हे आरोप खोटे आहेत असं महाजन कुटुंबियांचं म्हणणं असून त्यांचं खंडन करण्यात येत आहे. हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. प्रवीण महाजनच्या पुस्तकातले सर्व आरोप सत्यावर आधारीत असल्याचा दावा सारंगी महाजन यांनी केला आहे. तर प्रवीण महाजनचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. मराठी वृत्तपत्रात या पुस्तकाचा काही अंश प्रसिद्ध झाल्यामुळे प्रवीण महाजनने केलेलं लिखाण कायदेशीर परवानगीशिवाय प्रसिद्ध झालंच कसं, असा गोपीनाथ मुंडे यांनी सवाल केला आहे.मराठी वृत्तपत्रातील या हस्तलिखितामधे 'पैसे, बायका आणि सत्तेची प्रमोदला चढू लागलेली धुंदी पत्रकारांच्या कानावर येत असे ती भाजपाच्याच अनेक नेत्यांकडून किंवा या भानगडींना सांंभाळून घेणार्‍या कार्यकर्त्यांकडून',असे चारित्र्यहनन करणारे आरोपही केले आहेत. 'प्रमोदच्या वर्तुळाचा दबाव सगळ्यांवरच होता. त्या दबावामुळेच प्रमोदची अरेरावी आणि त्याचा बेबंद बाहेरख्यालीपणा खपून जात असे.''त्याच्या गॉसिप्समुळेच त्याचं मंत्रीपद आणि पक्षातील स्थान धोक्यात येऊ लागलं होतं'.आपण सगळ्या पक्षातील नेत्यांना विश्वासात आणतो, त्यामुळे आपल्या व्यक्तिगत चारित्र्याची कुणी चौकशीही करू नये, असं तो जाहीरपणे सांगत असे', अशा प्रकारचे राजकीय वर्तुळातील लांच्छनास्पद आरोपंही प्रविण यांनी केले आहेत. '2004 च्या निवडणुकीदरम्यान एकदा तो मला म्हणाला होता, की जसे गणपती वर्षातून एकदा दहा दिवस येतात तसाच संघाचा वापर निवडणुकीपुरताच करायचा असतो', असंही प्रविण यांनी आपल्या हस्तलिखितामधे नमूद केलं आहे.' प्रमोद हा फिक्सर, डबल डिलर, कारस्थानी, विधिनिषेधशून्य आणि नव्या राजकारण्यांमधील सर्वांत यशस्वी राजकारणी होता त्याच्यालेखी निवडणुका म्हणजे निधीसंकलन. त्या पैशातूनच तो त्याचे खासगी शौक पुरवीत असे.' तसंच 'प्रमोदनं सर्वांना खरेदी तरी केले होते किंवा त्यांच्यावर दहशत तरी नक्कीच बसवली होती', असे प्रमोद महाजन यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे आरोपही यात केले आहेत. या सगळ्या प्रकरणावर प्रवीण यांची पत्नी सारंगी महाजन यांनी IBN LOKMAT ला इ-मेल करून आपली प्रतिक्रिया कळवली आहे. 'या पुस्तकामागे कुणालाही दुखवण्याचा हेतू नसून, केवळ सत्य काय आहे, ते समोर यावं ,यासाठीच प्रवीणनं या आठवणी लिहिल्या आहेत, असं सारंगी यांचं म्हणणं आहे.'माझा अल्बम' हे स्मृती छायाचित्र प्रवीण महाजन यांनी नाशिक आणि आर्थर रोड तुरुंगात लिहिलेल्या स्मृती असून त्याची हस्तलिखित प्रत माझ्याकडे उपलब्ध आहे. या लिखाणाचे काही अंश वृत्तपत्रांमध्येप्रकाशित झाले आहेत. 'माझा अल्बम' लवकरच पुस्तकरुपाने प्रकाशित होत असून यासाठी माझ्याकडे अनेक प्रकाशकांनी संपर्क साधला आहे. या लिखाणातून कोणत्याही राजकीय पक्षाला, संघटनेला वा व्यक्तीला दुखावण्याचा किंवा त्यांच्या बदनामीचा हेतू नाही. यातील घटनाक्रम पूर्णपणे सत्य आहे आणि आठवणीतील संग्रहातून तो शब्दबद्ध करण्यात आला आहे.यातील घटनांचा कोणीही राजकारणासाठी वापर करु नये', असं सारंगी यांनी स्पष्ट केलं आहे.प्रवीण महाजनच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी प्रकाश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात प्रवीणचे सगळे आरोप धादांत खोटे असल्याचं प्रकाश यांनी म्हटलं आहे. प्रवीण नेहमीच प्रमोद यांना ब्लॅकमेल करायचा, असंही प्रकाश महाजन यांनी सांगितलं आहे.संस्काराच्या गोष्टी करणार्‍या प्रवीण आणि सारंगीबद्दलही प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत ताशेरे ओढले आहेत. शरद पवार यांनी अगदी दिल्लीतही प्रमोद यांना वारंवार मदत केली आहे या प्रवीण यांनी केलेल्या विधानाचाही प्रकाश महाजन यांनी समाचार घेतला. मुंडेंसारख्या मेहुण्याला ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्रास द्यायचं काम प्रवीणनं चालवलं आहे, असंही प्रकाश यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हे प्रकरण कोर्टात आहे आणि प्रवीण महाजन यांचं लिखाण कायदेशीर परवानगीशिवाय प्रसिद्ध झालंच कसं, असा सवाल गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2009 09:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2009 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close