S M L

सोनिया गांधींकडेच पक्षाची धुरा ?

Sachin Salve | Updated On: May 24, 2014 01:00 PM IST

सोनिया गांधींकडेच पक्षाची धुरा ?

24 मे : लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेसला चांगलाच हादरा बसलाय. काँग्रेसने आज (शनिवारी) संसदीय समितीची बैठक बोलावलीय. आजच्या बैठकीत पक्षाध्यक्ष निवडण्याचा निर्णय होणार आहे. 16 व्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवापूर्वी सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. पुन्हा एकदा सोनिया गांधींचीच अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.

सोनिया आज काँग्रेसच्या खासदारांचीही भेट घेणार आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्त्वाविरोधात काँग्रेसमध्ये वाढती नाराजी आहे, त्या पार्श्वभूमीवर एकूणच पराभवानंतर काँग्रेस नेत्यांचं मनोबल वाढवणं आणि विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला स्थान कसं मिळवता येईल यावरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने देशभरात केवळ 44 जागा जिंकल्यानं विरोधी पक्षासाठीच्या संख्याबळाची किमान अटही काँग्रेसला पूर्ण करता येत नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2014 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close