S M L

उत्तरप्रदेशमध्ये गोरखधाम एक्स्प्रेसला अपघात, 21 ठार

Sachin Salve | Updated On: May 26, 2014 06:43 PM IST

उत्तरप्रदेशमध्ये गोरखधाम एक्स्प्रेसला अपघात, 21 ठार

26 मे : उत्तर प्रदेशातल्या संत कबीर नगरमध्ये गोरखधाम एक्स्प्रेस रुळावरुन घसरलीय. गोरखपूरपासून 35 किलोमीटर अंतरावर हा अपघात झालाय. यामध्ये आतापर्यंत 21 जणांचा बळी गेला आहे, तर जवळपास 50 जणं जखमी झाल्याची माहिती आहे. या ट्रेनच्या बोगी एकमेकांमध्ये घुसल्या आणि अजूनही त्या एकमेकांमध्ये अडकल्या आहेत, असं समजतंय. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. गोरखाधाम एक्सप्रेस दिल्लीहून गोरखपूरला जात होती. उन्हाळ्याच्या सुट्‌ट्या असल्यामुळे रेल्वेला गर्दी जास्त होती. शहरापासून निर्जन ठिकाणी हा अपघात झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2014 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close