S M L

शिवसेना 'अवजड' खात्यामुळे नाराज

Sachin Salve | Updated On: May 27, 2014 08:43 PM IST

शिवसेना 'अवजड' खात्यामुळे नाराज

27 मे : एनडीएच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेल्या भाजपचा मित्रपक्ष शिवसेना खातेवाटपावरुन मात्र नाराज आहे. मंत्रिमंडळात शिवसेनेला एकच मंत्रिपद देण्यात आलंय. अनंत गीतेंना अवजड उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलंय.

अवजड उद्योग खात्याऐवजी शिवसेनेला आणखी महत्त्वाचं खातं मिळेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात एकच कॅबिनेटपद आणि तेही कमी महत्त्वाचं अशी भावना झाल्यामुळेच शिवसेना नाराज असल्याचं समजतंय. या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अनंत गीते यांची दिल्लीत ली मेरिडीयन हॉटेलमध्ये भेट झालीय.

आधीच केवळ एक कॅबिनेट मिळालेल्या शिवसेनेला दिल्लीत आज आणखी एक धक्का बसला कारण कॅबिनेटमध्ये दुय्यम दर्जाचं मानलं जाणार अवघड उद्योग खातं त्यांना देण्यात आलंय त्यामुळे शिवसेना चांगलीच नाराज झाली आहे. या नाराजीनंतर कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर अनंत गिते यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही.

या अवजड उद्योगासोबत आणखी एक खातं विभागून मिळावं यासाठी शिवसेनेतर्फे आज प्रयत्न करण्यात आला. यासंदर्भात भाजपच्या काही नेत्यांशी चर्चाही करण्यात आली मात्र पंतप्रधानांच्या आज दिवसभरातील व्यस्थ कार्यक्रमामुळे यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. यानंतर संध्याकाळी होत असलेल्या कॅबिनेट बैठकीला गिंतेंनी हजेरी लावली. याठिकाणी पंतप्रधानांशी याविषयी चर्चा करणार असल्याच सेनेच्या सूत्रांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2014 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close