S M L

केजरीवाल नरमले, जेलमधून झाली सुटका

Sachin Salve | Updated On: May 27, 2014 08:19 PM IST

898kejriwal27 मे : भाजपचे नेते नितीन गडकरी अब्रुनुकसानी खटल्या प्रकरणी अखेर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची सुटका झालीय. हायकोर्टाने त्यांच्या याचिकेवर सुनावणीच्या अगोदरच वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन घेण्याचे आदेश दिले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर केजरीवाल यांनी नरमाईची भूमिका घेतली असून वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन घेण्यास तयारी दर्शवली आहे.

गेल्या सात दिवसांपासून केजरीवाल तिहार तुरुंगात मुक्काम ठोकून आहे. बाँड भरल्यानंतर पतियाळा कोर्टाने केजरीवाल यांना सोडण्याचे आदेश दिले आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर केजरीवाल यांची सुटका झाली आहे. गेल्या सात दिवसांपासून केजरीवाल यांनी तिहार कारागृहाचा पाहुणचार घेतला. अब्रुनुकसानी खटल्या प्रकरणी 10 हजारांवर जामीन घेण्यास केजरीवाल यांनी नकार दिला होता.

कोर्टाने कानउघडणी केल्यानंतरही केजरीवाल आपल्या भूमिकेवर अडून बसले आणि जामीन घेण्यास नकार दिला. कोर्टाने पुन्हा त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी हायकोर्टात धाव घेतली मात्र कोर्टाने केजरीवाल यांना फटकारुन काढले आणि जामीन घेण्याचे आदेश दिले. केजरीवाल यांची आता तिहार कारागृहातून सुटका झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2014 08:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close