S M L

सेनेचे नाराजीनाट्य संपले,अखेर अनंत गीतेंनी पदभार स्वीकारला

Sachin Salve | Updated On: May 28, 2014 03:57 PM IST

सेनेचे नाराजीनाट्य संपले,अखेर अनंत गीतेंनी पदभार स्वीकारला

12313anant gite28 मे : अखेर शिवसेनेला डोईजड झालेलं अवजड खातं हलक करुन घ्यावं लागलं आहे. शिवसेनेची नाराजी दूर झालीय आणि अनंत गीते यांनी अवजड उद्योग खात्याचा पदभार स्वीकारला आहेत.

आज सकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. या चर्चेत शिवसेनेची नाराजी दूर झाली. यानंतर गीतेंना 'मातोश्री'वरुन फोन आला आणि पदभार स्वीकारा असं सांगण्यात आलं.

शिवसेनेला आणखी एक खातं मिळण्याची शक्यता आहे. पण यावर एक-दोन दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. खातेवाटपात शिवसेनेकडे अवजड उद्योग खातं आलं. त्यावर उद्धव ठाकरे नाराज झाले आणि या खात्याचा पदभार स्वीकारायचा की नाही, यावर सेनेत चर्चा चालली होती अखेर यावर पडदा पडला.

 'डिपार्टमेंट बुरा है. तो उसे अच्छा किजीए' , मोदींनी सुनावले

पण खाते मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये पडद्यामागे बरंच काही घडलं. 26 मे रोजी जेव्हा नरेंद्र मोदींनी संभाव्य मंत्र्यांना चहापानासाठी बोलवलं, तेव्हा त्यांनी प्रत्येकाला कोणतं खातं मिळणार याची कल्पना दिली होती. आपल्याला अवजड उद्योग खातं मिळतंय हे गीतेंनी उद्धवना सांगितलं नाही. गीतेंनी असं का केलं हा मोठा प्रश्नच आहे. शपथविधीच्या रात्री जेव्हा उद्धवना या खात्याबाबत कळलं, तेव्हा त्यांना धक्का बसला. यानंतर गीतेंची दिल्लीत धावाधाव सुरू झाली. गीते भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना भेटले. पण याबाबत निर्णय मोदी घेणार होते.

दुसर्‍या दिवशी सार्क नेत्यांबरोबर मोदींच्या बैठका होत्या. त्याच्या तयारीत मोदी व्यस्त होते. मंगळवारी संध्याकाळी कॅबिनेटच्या बैठकीनंतर गीते मोदींना म्हणाले की 'ये डिपार्टमेंट बुरा है' त्यावर मोदींनी उत्तर दिलं, 'तो अच्छा किजीए उसे' !, मोदींनी असं उत्तर दिल्यावर गीतेंनी मीडियाशी बोलण्यास सुरुवात केली आणि भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी मोदी आणि उद्धव यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव यांची नाराजी दूर झाली आणि गीतेंना मातोश्रीवरुन फोन आला आणि त्यांना पदभार स्वीकारा असं सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2014 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close