S M L

'मोदी सरकार'ची आज संध्याकाळी बैठक

Sachin Salve | Updated On: May 28, 2014 12:32 PM IST

'मोदी सरकार'ची आज संध्याकाळी बैठक

28 मे : मोदी सरकारची आज संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तारखा आणि सीमांध्रातल्या पोलावरम सिंचन प्रकल्पावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सीमांध्रतला हा गोदावरी नदीवरचा प्रकल्प अनेक वर्षांपासून कागदावर पडून आहे पण वादात अडकल्यामुळे याबाबत निर्णय प्रलंबित आहे. हा प्रकल्प झाला तर आसपासच्या 276 गावांमधल्या तब्बल 50 हजार लोकांना स्थलांतर करावं लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जाही देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2014 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close