S M L

काश्मीर वडिलोपार्जित संपत्ती वाटते काय?:संघ

Sachin Salve | Updated On: May 28, 2014 01:05 PM IST

काश्मीर वडिलोपार्जित संपत्ती वाटते काय?:संघ

28 मे : जम्मू आणि काश्मीर भारताचा भाग असणार नाही ? ओमरना त्यांचं राज्य त्यांची वडिलोपार्जित संपत्ती वाटते काय? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपस्थित केलाय. तसंच 370 कलम असो वा नसो, जम्मू आणि काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य भाग  राहील असं संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी म्हटलंय.

मंगळवारी संध्याकाळी मोदी सरकारची केंद्रीय बैठक पार पडली या बैठकीत कलम 370 जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे हे कलम रद्द करण्यात येणार असल्याचे संकेत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिले. त्यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कडाडून विरोध केला.

कलम 370 वरून सुरू झालेल्या वादावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी आपलं मत ट्विटरवरून मांडलंय. "अनेक वर्षांनी मोदींच्या सरकारच्या आठवणीही लोकांच्या मनातून जातील तेव्हा एकतर जम्मू काश्मीर भारताचा भाग नसेल किंवा मग कलम 370 अस्तित्वात असेल. जम्मू काश्मीर आणि उर्वरित भारत यांच्यात कलम 370 हा एकमेव दुवा आहे. हे कलम रद्द करण्याची बाब ही गांभीर्याची जाणीव नसल्याची किंवा बेजबाबदारपणाची आहे अशी टीका अब्दुल्ला यांनी केली.

ओमर अब्दुल्लांच्या टीकेचा संघाने समाचार घेतला. संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी याबद्दल ट्विटवर प्रतिक्रिया नोंदवली. जम्मू आणि काश्मीर भारताचा भाग असणार नाही ? ओमरना त्यांचं राज्य त्यांची वडिलोपार्जित संपत्ती वाटते काय? 370 असो वा नसो, जम्मू आणि काश्मिर नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहील असंही माधव म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2014 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close