S M L

'स्मृती'भ्रम, बीए झालं आणि बी कॉमही ?

Sachin Salve | Updated On: May 28, 2014 04:32 PM IST

'स्मृती'भ्रम, बीए झालं आणि बी कॉमही ?

23smrutiirani28 मे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन वाद निर्माण झाला आहे. पण स्मृती इराणी आपल्या शैक्षणिक पात्रतेची माहिती लपवल्याची बाब समोर आली आहे. इराणी यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेविषयी निवडणूक आयोगाकडे 2 वेगवेगळी प्रतिज्ञापत्रं सादर केली आहेत.

2004 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 1996 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए केल्याचा उल्लेख केला आहे तर 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 1994मध्ये दिल्ली विद्यापीठातून बी कॉम केल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे इराणी यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती पुरवल्याचा आरोप होतोय.

दरम्यान, या वादाची सुरुवात झाली ती काँग्रेस नेते अजय माकन यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे. स्मृती इराणी फक्त 12 वी पास असताना त्यांना हे खातं कसं काय दिलं जाऊ शकतं, असा टोला त्यांनी लगावला होता. तर काँग्रेसचे नेते नैराश्यातून अशी टीका करत असल्याचं उत्तर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलं. इतकंच नाही तर सोनिया गांधी किती शिकल्या आहेत, असा सवाल उमा भारती यांनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2014 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close