S M L

नेत्यांच्या पुनर्वसनासाठी काँग्रेसचं लॉबिंग

Sachin Salve | Updated On: May 28, 2014 09:15 PM IST

cm and manikrao28 मे : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसने डॅमेज कंट्रोल सुरू केलंय. राज्यपाल नियुक्त सहा आमदारांची नावं निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी संभाव्य नाावांविषयी प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काही नाव चर्चेत आली आहेत. कला, शिक्षण, साहित्य, क्रीडा आणि सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींची राज्यपाल नियुक्त आमदारकी साठी निवड करण्याचे संकेत आहेत.

पण कायम या संकेतांना बाजूला सारुन सत्ताधारी पक्षाकडून राजकीय व्यक्तींचीच निवड केली जाते. आता देखील सहा राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काँग्रेसकडून प्रदेश काँग्रेस पदाधिकार्‍यांची निवड करण्याच्या हालचाली चालल्या आहेत. अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारकीचा वापर केला जातोय.

काँग्रेसकडून जी नावं चर्चेत आली आहेत ती कोणती आहेत ?

  • - रोहिदास पाटील ( माजी मंत्री आणि प्रदेश उपाध्यक्ष)
  • - गणेश पाटील ( प्रदेश काँग्रेस सरचिटणीस )
  • - बसवराज पाटील नगराळकर ( प्रदेश काँग्रेस सचिव )
  • - निर्मला सामंत प्रभावळकर ( मुंबईच्या माजी महापौर आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य )
  • - हुसैना बानू खलिते ( प्रदेश काँग्रेस सचिव )
  • - टी. पी. मुंडे ( प्रदेश काँग्रेस सचिव )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2014 08:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close