S M L

अगोदर काम पाहा, मग बोला!

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2014 02:53 PM IST

अगोदर काम पाहा, मग बोला!

smirit irrranii29 मे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन वाद निर्माण करणार्‍या काँग्रेस नेत्यांना उत्तर देत इराणी यांनी माझं मूल्यमापन माझ्या कामावरून करा, असे म्हटले आहे.

'माझं मूल्यमापन माझ्या कामावरून करा. माझं लक्ष विचलित व्हावं, यासाठी वाद काढला जातो आहे.  यापूर्वी भाजपमध्ये केलेले कार्य आणि बजावलेल्या भूमिकांमुळेच मला मंत्रीपद मिळाले आहे. माझ्यातील क्षमतेमुळेच पक्षाने मला या पदापर्यंत पोहोचवले आहे.' असं त्या म्हणाल्या.

काँग्रेसने स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर आता स्मृती इराणींनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रावरून नवा वाद उभा राहिला आहे. 2004 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 1996 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए केल्याचा उल्लेख केला आहे तर 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 1994मध्ये दिल्ली विद्यापीठातून बी कॉम केल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे इराणी यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती पुरवल्याचा आरोप होतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2014 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close