S M L

असा आहे मोदींचा 10 कलमी कार्यक्रम !

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2014 06:36 PM IST

असा आहे मोदींचा 10 कलमी कार्यक्रम !

235Naredra modi @ work29 मे : 16व्या लोकसभेच्या संसदेचं विशेष अधिवेशनाला 4 जूनपासून सुरवात होत असल्याची, माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे.

आज सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. हे अधिवेशन 4 जूनपासून 12जूनपर्यंत होणार आहे. 4 आणि 5 जूनला नवीन खासदारांचा शपथविधी होईल. 6 जूनला लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईल. नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत कमलनाथ हंगामी अध्यक्ष काम पाहतील. 9 जूनला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील तर 10 आणि 11 जूनला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल, असेही नायडू म्हणाले.

चांगले प्रशासन हाच मोदी सरकाराचा अजेंडा असून, शिक्षण, आरोग्य, पाणी, उर्जा आणि रस्ते या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच देशाला संबोधित करणार असून त्यात ते सरकारची दिशा स्पष्ट करणार आहेत. सरकार प्राधान्य देणार असलेल्या 10 गोष्टी त्यांनी जनतेसमोर मांडल्यात.

नरेंद्र मोदींचा टॉप 10 अजेंडा

 • अर्थव्यवस्थेत वाढती गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवर लक्ष
 • नवीन कल्पनांचं स्वागत आणि अधिकार्‍यांना काम करण्याचं स्वातंत्र्य
 • शिक्षण,आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते या व्यवस्थांवर भर
 • कामकाजात पारदर्शकता, सरकारी कामांसाठी ई- टेंडरचा वापर
 • सरकारची धोरणं संपूर्ण सरकारी यंत्रणेपर्यंत पोचवणं आणि यंत्रणा लोकाभिमुख करणं
 • विविध मंत्रालयांमध्ये चांगला समन्वय
 • महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अधिकार्‍यांमध्ये विश्वास निर्माण करणं
 • लोकांसोबतचा संवाद वाढवण्यासाठी टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाचा वापर
 • स्थिर सरकार आणि दूरगामी धोरणांवर भर
 • ठराविक वेळेत धोरणांची अंमलबजावणी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जोमानं कामाला लागले आहेत. पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारल्यानंतर PMO ऑफिसमध्ये मोदी सकाळी साडे आठ नंतर हजर होतात आणि कामाला सुरवात होते. मोदींनी आज सकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर आपल्या कार्यालयात फेरफटका मारला आणि अधिकार्‍यांशी चर्चा केली.

या वेळेस नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना, त्यांनी काय करावं आणि काय करु नये याची यादी दिली आहे.

काय करावं आणि काय करु नये

 • आपल्या खात्यातील कर्मचार्‍यांची निवड करताना खबरदारी बाळगण्याची सूचना दिली गेली आहे.
 • त्याचबरोबर स्वतःच्या नातेवाईकांना न नेमण्याच्या सूचनाही मोदींनी मंत्र्यांना दिल्या आहेत.
 • मंत्र्यांनी बोलताना खबरदारी बाळगण्याच्या सूचना मोदींनी दिल्यात.
 • प्रत्येक मंत्र्यांनी फक्त त्यांच्या खात्यांविषयीच भाष्य करावं अशा सूचनाही मोदींनी दिल्यात.
 • आपण घराणेशाही किंवा नातेवाईकांना प्राधान्य देण्यास महत्व देणार नाही हेही मोदींनी स्पष्ट केलं आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2014 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close