S M L

राहुल गांधी विदुषक, काँग्रेस नेत्याचा घरचा अहेर

Sachin Salve | Updated On: May 29, 2014 05:03 PM IST

राहुल गांधी विदुषक, काँग्रेस नेत्याचा घरचा अहेर

76rahul_gandhi29 मे : लोकसभा निवडणुकात झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधली खदखद आता वाढत चाललीय. पराभवामुळे नाराज झालेल्या एका काँग्रेसच्या नेत्यांनेच राहुल गांधी यांना विदुषकाची उपाधीच देऊ केलीय.

केरळचे ज्येष्ठ नेते टी.एच. मुस्तफा यांनी राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका केली. काँग्रेसच्या पराभवाला राहुल गांधीच जबाबदार आहे. त्यांच्या नेतृत्व गूण नाही त्यामुळे काँग्रेसमधून राहुल गांधींची हकालपट्टी करावी आणि प्रियांका गांधींनी पक्ष वाचवण्यासाठी सक्रीय रहावं अशी मागणी टी.एच. मुस्तफा यांनी केलीय.

राहुल यांची चुकीची धोरणं आणि अपरिपक्व पद्धतींमुळेच काँग्रेसचा पराभव झाला अशी टीकाही मुस्तफा यांनी केलीय. तर दुसरीकडे राहुल यांनी लोकसभेचं विरोधीपक्ष नेतेपद स्वीकारावं अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2014 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close