S M L

दिग्विजय म्हणतात, या केजरीवाल भ्रष्टाचाराविरोधात एकत्र लढू !

Sachin Salve | Updated On: May 29, 2014 05:02 PM IST

दिग्विजय म्हणतात, या केजरीवाल भ्रष्टाचाराविरोधात एकत्र लढू !

29 मे : काँग्रेसचे वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेले नेते दिग्विजय सिंह यांनी आता वेगळाची शक्कल लढवली आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिग्विजय सिंह यांनी आमंत्रणच दिलंय. अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड करण्यासाठी आपल्या सोबत यावं असं आवाहन दिग्विजय सिंह यांनी केलंय. दिग्विजय यांनी यासंबंधी ट्विट केलंय.

केजरीवाल हे वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन घेण्यास राजी झाले त्याचा मला आनंद आहे. गडकरींची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड करण्यासाठी केजरीवाल गंभीर असतील, तर त्या प्रकरणाचा लढा देण्यासाठी त्यांनी माझ्याबरोबर काम करावं असं आवाहन दिग्विजय यांनी दिलंय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि 'आप'चा सुपडा साफ झालाय. काँग्रेसचा आजवरचा हा सर्वात मोठा पराभव झालाय तर केजरीवाल यांना जनतेनंच 'आप'टले.

भाजपचे नेते नितीन गडकरी मानहानी प्रकरणी केजरीवाल यांनी 10 हजार रुपयांचा जामीन भरण्यास नकार दिल्यामुळे त्यांना 7 दिवसांचा तुरूंगवास भोगावा लागला. दिल्लीच्या आंदोलनाच्यावेळी दिग्विजय यांनी केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली होती. आता सत्ता गेल्यामुळे दिग्विजय यांनी केजरीवाल यांनाच मैत्रीसाठी हात पुढे केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2014 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close