S M L

सुरक्षा शोबाजीसाठी नको, वडरांची विमानतळावरची सुरक्षा हटवणार ?

Sachin Salve | Updated On: May 29, 2014 11:08 PM IST

सुरक्षा शोबाजीसाठी नको, वडरांची विमानतळावरची सुरक्षा हटवणार ?

robert vadra in airport security29 मे : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावाई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वडरा यांना विमानतळावर देण्यात येणारी सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात येण्याचे संकेत नागरी उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी दिले आहे. खरोखर गरज असेल तरच सुरक्षा द्यावी फक्त शोबाजी करण्यासाठी सुरक्षा नको असा टोलाही राजू यांनी लगावला.

एखाद्याच्या जीवाला धोका असेल तर समजू शकतो. मी थेट वडरा यांच्याबाबत बोलू इच्छित नाही. पण शक्यतो प्रत्येक नागरिकानं विमानतळावरच्या सुरक्षा चाचणीला सामोरं जावं असं वाटतं म्हणून आम्ही हा निर्णय घेण्याचा विचार करत आहोत असंही त्यांनी सांगितलं.

तसंच माझ्या मते सुरक्षेला काही अर्थ असला पाहिजे, ती मिरवण्यासाठी नको. जर कुणाच्या जिवीताला धोका असेल तर ठीक आहे, मी वडरांबद्दलच बोलतोय असं नाही, पण, सर्वसाधारणपणे सर्वांना सारखा न्याय हवा असं स्पष्टीकरण गजपती राजू यांनी दिलं. पण या सुरक्षाव्यवस्थेसंदर्भातला अंतिम निर्णय गृहमंत्रालयच घेणार आहे.

कोणतंही नवीन सरकार स्थापन झाल्यावर त्यांच्याकडून सुरक्षेचा आढावा घेतला जातो असा खुलासा भाजपचे प्रवक्ते एम.जे.अकबर यांनी दिला. वडरा यांना सुरक्षा पुरवल्यामुळे विमानतळावर त्यांची चौकशी होत नाही. विमानतळावर देशातील प्रतिष्ठीत आणि सर्वोच्च अशा लोकांची यादी असते. ज्यांना भारत रत्न मिळालं त्यांचीही नावं यात असता. पण इथं वडरा यांचंही नाव आहे, असं का ? हे सरकार जनतेच आहे आम्हाला जनतेला उत्तर द्यावं लागले असंही अकबर म्हणाले. वडरा यांना सुरक्षेत सूट द्यावी की नाही हा नव्या सरकारचा निर्णय असेल. पण त्यांनी इतरही लोकांच्या सुरक्षेचा विचार करुन निर्णय घ्यावा असं काँग्रेसचे नेते अखिलेश प्रताप सिंह यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2014 10:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close