S M L

विमानतळावर आम्हाला विशेष सुरक्षा नको -प्रियांका गांधी

Sachin Salve | Updated On: May 30, 2014 11:51 PM IST

विमानतळावर आम्हाला विशेष सुरक्षा नको -प्रियांका गांधी

7887priyanka_gandhi30 मे : विमानतळावर माझे पती रॉबर्ड वडरा, मला आणि माझ्या मुलांना मिळणारी विशेष वागणूक काढून टाका असं पत्रच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी एसपीजी संचालकांना लिहिलं आहेत.

स्वत:सह पती रॉबर्ट वडरा आणि मुलांना विमानतळावर मिळणारी विशेष वागणूक काढून घेण्याची विनंती प्रियांका यांनी केली आहे. अशी कोणतीही विशेष वागणुकीची आम्ही मागणी केली नव्हती, तर ती देण्यात आली. त्यामुळे ती काढून टाकावी असंही प्रियांका स्पष्ट केलं.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावाई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वडरा यांना विमानतळावर देण्यात येणारी सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात येण्याचे संकेत नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिले होते. खरोखर गरज असेल तरच सुरक्षा द्यावी फक्त शोबाजी करण्यासाठी सुरक्षा नको असा टोलाही राजू यांनी लगावला होता. पण, फक्त एका पत्रावरुन ही विशेष वागणूक काढता येत नाही तर त्यासाठी गुप्तचर विभागाकडून माहिती मागवावी लागेल, असं एसपीजी संचालकांनी स्पष्ट केलंय.

प्रियांका गांधी यांनी काय लिहिलंय पत्रात ?

"वडरा कुटुंबीयांचं नाव यादीमध्ये घालण्याचा निर्णय एसपीजी आणि दिल्ली पोलिसांमध्ये असणार्‍या तुमच्या आधीच्या अधिकार्‍यांनी घेतला होता. आमच्या दोघांपैकी कुणीही तशी विनंती केली नव्हती. त्यानंतर माझ्या पतीला कायम या मुद्द्यावरून मानहानी सहन करावी लागली. (रॉबर्ट) यांनी अनेक प्रसंगी मला ही सवलत काढून टाकायला सांगितलं होतं."-प्रियांका गांधी

संबंधीत बातम्या

सुरक्षा शोबाजीसाठी नको, वडरांची विमानळावरची सुरक्षा हटवणार ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2014 10:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close