S M L

बदायू गँगरेप प्रकरणी पाचवा नराधम अटकेत

Sachin Salve | Updated On: May 31, 2014 01:23 PM IST

बदायू गँगरेप प्रकरणी पाचवा नराधम अटकेत

234badaun_gangrape31 मे : उत्तर प्रदेशातील बदायू सामूहिक बलात्कार प्रकरणी पाचव्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोन आरोप अजूनही फरार आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या 5 जणांपैकी 2 जण हे पोलीस कर्मचारी आहेत. या दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय.

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये काही दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला नराधम बलात्कार करुन थांबले नाही तर त्या दोन्ही अल्पवयीन मुलींना झाडाला लटकवून त्यांना फाशी दिली. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशातच नाही तर देशभरात खळबळ उडाली आहे.

जनक्षोभ उसळल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली. या प्रकरणी आज पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली. तरी आणखीन 2 आरोपी अजूनही फरार आहेत. दरम्यान, पराभवातून सावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कामाला लागले आहे. राहुल गांधी यांनी आज बदायू गावाला भेट दिली. मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वन केलं. यावेळी राहुल यांनी अखिलेश सरकारवर सडकून टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2014 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close