S M L

'मुंडेंचं निधन यकृताला दुखापत झाल्यामुळे; घातपात नाही'

Sachin Salve | Updated On: Jun 4, 2014 08:58 AM IST

'मुंडेंचं निधन यकृताला दुखापत झाल्यामुळे; घातपात नाही'

02_Funeral-procession-of-late-BJP-leader-Gopinath03 जून : केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन अपघातात बसलेल्या जबर धक्क्यामुळे मान आणि लिव्हरला दुखापत झाली त्यानंतर त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला त्यामुळे त्यांचं निधन झालं. मुंडेंच्या मानेच्या हाडाला फॅक्चर झाला, मानेला रक्तपुरवठा करणार्‍या धमण्यांना दुखापत झाली असा खुलासा 'एम्स'च्या डॉक्टरांनी पोस्टमार्टेम अहवालामध्ये केला आहे. गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला की, घातपात याबद्दल शंका कुशंका व्यक्त केली जात होती, मात्र एम्सच्या डॉक्टरांनी यावर खुलासा केला तसंच गुप्तचर विभागानेही अपघातामागे घातपाताची शक्यता फेटाळली आहे. मुंडेंचा मृत्यू अपघातानंच झालाय, असं गुप्तचर विभागाचं म्हणणं आहे. दरम्यान, गोपीनाथ मुंडेंच्या कारला धडक देणार्‍या इंडिका कारच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली होती पण त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचं आज सकाळी नवी दिल्लीत अपघाती निधन झालं. बीडमध्ये आज त्यांचा जाहीर सत्कार होता. त्यासाठी ते विमानतळाकडे येत असतानाच एक वेगवान गाडीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. मुंडे यांच्या जाण्याने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

गोपीनाथ मुंडे.. एक चिरतरुण व्यक्तिमत्त्व.. आयुष्यभर संघर्ष करून.. त्याचं फळ मिळालं.. तेव्हा त्यांनी अकाली एक्झिट घेतली.. बीडमधल्या विजय रॅलीला येण्यासाठी ते सकाळी 6 वाजता दिल्लीतल्या घरातून निघाले. पण पृथ्वीराज रोडवरुन जात असताना.. अरबिंदो चौकात.. एका भरधाव इंडिकाने त्यांच्या मारुती sx4 या गाडीला धडक दिली. मुंडे मागच्या बाजूला डावीकडून बसले होते. इंडिका याच भागावर आदळली. मुंडे आतल्या आत फेकले गेले. त्यांनी नायर या त्यांच्या सचिवाला पाणी मागितलं आणि हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. त्यांना ताबडतोब ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या देशातल्या अग्रगण्य हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथे पोहचेपर्यंतच त्यांच्या हाताची नाडी आणि श्वासोच्छ्वास बंद झाला होता. त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झाला होता आणि हृदयविकाराचा झटका आला होता. सीपीआर देऊन वाचवण्याचा 50 मिनिटं प्रयत्न करण्यात आला. अखेर त्यांना 7.20 च्या सुमारास मृत घोषित करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हर्षवर्धन तोवर दवाखान्यात पोहोचले त्यांनी ताबडतोब घरच्यांना ही बातमी कळवली.

त्यानंतर मुंडेंच्या पत्नी प्रज्ञा मुंडे आणि इतर कुटुंबीय दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांची मुलगी आणि आमदार पंकजा पालवे यांनी धीराने सर्वांच्या भेटी घेतल्या. दुपारी एकच्या सुमारास मुंडेंचं पार्थिव भाजप मुख्यालयात पोहोचलं. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपर्यंत सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी मुंडेंना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव मंुबईतल्या वरळी इथल्या पूर्णा निवासस्थानी आणण्यात आलंय. अंत्यदर्शनासाठी तिथं रीघ लागलीय. राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी मुंडेंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. तसंच बॉलिवूडच्या स्टारर्संनी मुंडेंच्या श्रद्धांजली वाहिली.

तसंच भाजपचे सर्व नेते उपस्थित आहे. उद्या त्यांचं पार्थिव परळी इथं नेण्यात येणार असून अंत्यसंस्कार होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2014 10:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close