S M L

आम आदमी पक्षामधले अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Samruddha Bhambure | Updated On: Jun 6, 2014 09:15 PM IST

manish sisodia

06 जून : आम आदमी पक्षातले वाद आता चव्हाट्यावर आलेत आणि पक्षातले नेतेच आता हे मान्य करतायत. पक्षात काही समस्या आहेत, हे प्रशांत भूषण यांनी मान्य केलं आहे. पण, योगेंद्र यादव यांना एकाकी पाडण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. आज सकाळीच मनिष सिसोदिया यांनी लिहिलेला योगेंद्र यादव यांच्यावर टीका करणारा ई-मेल उघड झाला होता. यादव अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करताहेत आणि अंतर्गत बाबी उघड करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान नेत्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्र आणि इमेलमधला तपशील प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल योगेंद्र यादव नाराज आहेत, अशीही माहिती आहे. 'आप'च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते पक्ष सोडण्याबाबत निर्णय घेतील, अशीही चर्चा होती. पण, पक्षातल्या कुठल्याच सदस्याचा राजीनामा घेण्यात आलेला नाही, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

योगेंद्र यादव यांनी ई-मेल करून नाराजी व्यक्त केलीय. त्यात त्यांनी 'मला वाटलं होतं की लोकसभा निवडणुकीनंतर आम्हाला चर्चेची आणि सुधारणांची संधी मिळेल. पण, मला वाटतं आपण फक्त निवडणुकाच हरलो नाही तर त्यापेेक्षाही महत्त्वाचं काही गमवायला सुरुवात केलीय, ते म्हणजे आपली दिशा आणि चुका सुधारण्याची वृत्ती. निवडणुकीच्या निकालांना सामोरं जाता यावं आणि एकत्रितपणे आत्मपरीक्षण करता यावं, हेच माझ्या राजीनामा देण्याचं कारण होतं.' असं म्हटलं आहे.

आम आदमी पक्षातल्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत पक्षाला रामराम केला आहे.

  • मे 2014 : कॅप्टन गोपीनाथ
  • मे 2014 : शाजिया इल्मी
  • एप्रिल 2014 : मौलाना मकसूद अली काझमी
  • फेब्रु. 2014 : मधू भादुरी
  • फेब्रु. 2014 : विनोद कुमार बिन्नी
  • नोव्हें. 2013 : सुरजीत दासगुप्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2014 08:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close