S M L

गडकरी अब्रुनुकसान प्रकरण: केजरीवालांवर आरोप निश्चित

Samruddha Bhambure | Updated On: Jun 6, 2014 08:14 PM IST

गडकरी अब्रुनुकसान प्रकरण: केजरीवालांवर आरोप निश्चित

06  जून : नितीन गडकरींनी अरविंद केजरीवालांवर दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या संदर्भात आज सुनावणी झाली. आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दोघं आज कोर्टात हजर होते.

गडकरी आणि केजरीवाल या दोघांनीही आपापसातले हे मतभेद मिटवावेत असा सल्ला न्यायाधीशांनी दिला होता. असं केल्याने लोकांसमोर योग्य उदाहरण मांडलं जाईल असं मत न्यायाधीशांनी व्यक्त केलं. केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेतल्यास खटला मागे घेण्याची तयारी गडकरी यांनी दाखवली पण अरविंद केजरीवालांनी आरोप मागे घ्यायला नकार दिला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या आता अब्रुनुकसानीचा खटला चालणार आहे.

'आप'ने जाहीर केलेल्या भारतातल्या भ्रष्ट व्यक्तींच्या यादीत नितीन गडकरींच्या नावाचा उल्लेख असल्याने नितीन गडकरींनी हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. दरम्यान संसदेच्या कामकाजाला हजर राहता यावं यासाठी गडकरींना कोर्टात अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अरविंद केजरीवालांनाही अशाप्रकारची परवानगी मिळालेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2014 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close