S M L

अखेर मान्सून केरळमध्ये दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Jun 6, 2014 09:11 PM IST

अखेर मान्सून केरळमध्ये दाखल

rain06 जून : गेले पाच दिवस प्रतीक्षा करायला लावणारा मान्सून अखेर आज केरळमध्ये दाखल झाला आसून केरळसह दक्षीणच्या इतर काही भागांमध्ये पावसाने आज जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान खत्याच्या अंदानुसार येत्या आठवड्याभरात मुंबईत पावसाला सुरूवात होऊ शकते आहे.

मान्सून केरळमध्ये दरवर्षीपेक्षा काहीसा उशिरा दाखल झाला आहे. त्यातच यंदा नेहमीपेक्षा कमी पर्जन्यामानाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुढच्या 48 तासांत मान्सून अधिक सक्रिय होईल आणि पश्चिम किनारपट्टीला आणखीन वर सरकेल असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस आणि चक्रीवादळाचा फटका बीड जिल्ह्यातल्या 40 गावांना चक्री वादळाचा फटका बसला आहे. या चक्री वादळानं आष्टी तालुक्यातल्या चिमुरड्या रुपाली गंजचा जीव घेतला आहे तर चक्री वादळाचा सर्वाधिक फटका आष्टी तालुक्याला बसला आहे. 3 वर्षांची चिमुरडी रुपालीच्या अंगावर भिंत कोसळल्यानं ती दगावली. या वादळाचं स्वरुप इतकं भयंकर होतं की अनेक झाडं उन्मळून पडली, घरांवरचे पत्रे उडाले, विजेचे खांब आडवे झाले. बीडसांगवी गावातल्या 20 पेक्षा जास्त घरांची छप्परं उडून गेलीयेत तर तवलवाडीसह अनेक गावांमधल्या जिल्हा परिषद शाळांचे पत्रे उडून गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2014 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close